काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा दि. 29 गुरुवार रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात अशोक बंगला येते संपन्न झाला. सर्वप्रथम ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला यानंतर कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व मातोश्री वत्सलाबाई पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. निलंगा शहरातील हजरत पिरपाशा दर्गा व हजरत दादापीर दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. अशोक बंगला येथे निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळसह , लातूर जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्तेसह शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, वकील, डॉक्टर, अधिकारी यांनी आज गुरुवारी अशोक बंगला येथे भाऊगर्दी केली. तसेच भ्रमणध्वनी संदेशाव्दारे अशोकराव चव्हाण , महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, यशोमती ठाकूर, संजय बनसोडे, माजी आमदार बसवराज पाटील, शैलश पाटील चाकूरकर, काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे, सचिन सावंत, आ विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.अभिमन्यू पवार, आ.बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्शवर्धन पाटील, माजी मंत्री नसीम खान, नितीन राऊत आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी नगराध्यक्षा सुनिताताई चोपणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हल्लाप्पा कोकणे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रा. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, अशोकप्पा शेटकार, मोहनराव भंडारे, माधवराव पौळ, हाझी सराफ, महेश भंडारे, पद्मसींग पाटील, बाबुराव भंडारे, माजी जि.प. सदस्य अरुणाताई सुरवसे, आण्णाराव सुर्यवंशी, शिवसेनेचे ईश्वर पाटील, विनोद आर्य, अविनाश रेशमे, प्रशांत वांजरवाडे, वकील बार असोशीयशनचे अँड. अजित माकणे, अँड.तिरुपती शिंदे, अँड. जगदीश सुर्यवंशी, अँड.शकील पटेल, अँड.विक्रांत सुर्यवंशी, डॉ. शेषेराव शिंदे, डॉ. पाटील, शहरातील सर्व पत्रकार बंधु, गोविंद शिंगाडे, प्रकाश बाचके, दयानंद चोपणे, अझगर अन्सारी, सिराज देशमुख, अभय साळुंके, सुधाकर पाटील, नारायण सोमवंशी, गंगाधर चव्हाण, सुरेंद्र धुमाळ, दिनकर निटुरे, सतिष कोनेरे, देवदत्त पाटील, पांडुरंग बिराजदार, गजेंद्र तरंगे, निलंगा तालुक्यातील धानोरा गावचे माजी सरपंच सुरेश जाधव , चेअरमन व्यंकट जाधव , रशिद शेख , फुलचंद जाधव ,दिनकर जाधव ,प्रकाश थोरमोटे , प्रवीण फताटे ,अंगद जाधव , राजू सिरसिलले ,धोंडिबा जाधव ,बब्रुवान काळे ,शिवाजी जाधव व शिरुर अनंतपाळचे आबासाहेब पाटील उजेडकर, लक्ष्मणराव बोधले, रामकिशन गड्डीमे, प्रकाशदादा पाटील बाकलीकर, सुधर लखनगावे, राम गायकवाड, अनिल देवंगरे, जनार्धन पाटील सुमठाणकर, सोमनाथ तोंडारे, तानाजीराव निडवंचे, प्रभाकर बंडकर, वैशंपायन जागले, सुतेज माने-पाटील, भरत शिंदे, अमर आवाळे, दत्ता भोसले, अशोक कोरे, निलंग्यातील शरद गायकवाड, सोमनाथ कदम, गोविंद सुर्यवंशी , रोहित बनसोडे, बालाजी गोमसाळे, अमोल सोनकांबळ, परमेश्वर सुर्यवंशी, शरद सोळुंके, प्रसाद झरकर, विकास पाटील, बबनराजे, राजाभाऊ साळुंके, संभाजी जाधव, रामदास सोमवंशी, इरफान शेख, बब्रुवान चव्हाण, विकास नाईकवाडे, संतोष नाईकवाडे, देवणीतील अनंत पाटील टाकळीकर, शरण लुल्ले, वैजिनाथ लुल्ले, देविदास पतंगे, गजानन भोपणीकर, निलंगा तालुक्यातील तानाजीराव डोके, लोभे तानाजी, सतिष कदीरे, स्वरुप येळीकर, प्रशांत येळीकर, अजित पवार, पुंडलिक बिराजदार, दिनकर बिराजदार, गड्डीमे, मारुती बिराजदार, मंगेश जाधव, बालाजी उसनाळे, श्रीमंत उसनाळे, विलास सुर्यवंशी शेषेराव कांबळे, गोपाळ पवार, लक्ष्मण कांबळे, दत्ता मोहोळकर, जिल्हाध्यक्ष RPI विलासजी सुर्यवंशी, दिगंबर सुर्यवंशी आदींनी अशोक बंगला येथे मा. अशोकभैय्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

0 Comments