अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात प्रभावी वापर; ड्रोनद्वारे सोयाबीन फवारणी एक नावीन्यपूर्ण उपक्रम
औसा तालुक्यात प्रथम फवारणीचा प्रयोग
बी डी उबाळे
औसा-महाराष्ट्र शासन कृषि विभाग व मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि 29 जुलै 2021 रोजी सेलू , ता. औसा येथे राजश्री कदम यांच्या शेतावर ड्रोन द्वारे सोयाबीन व पपई या पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च ,(ICAR,)नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार गरुडा एरोस्पेस कंपनी, बेंगलोर यांनी ड्रोन द्वारे सोयाबीन व पपई या पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कृषी क्षेत्रात प्रथमच ड्रोनद्वारे फवारणीचा अभिनव उपक्रम आज सेलू येथे राबविण्यात आला .कमी खर्चात व कमी वेळेत सोयाबीन व पपई या पिकावर फवारणी करण्यात आली. सदर ड्रोनद्वारे एक एकर फवारणी करिता केवळ दहा ते पंधरा मिनिटे लागतात. तुमच्या बारा लिटर क्षमतेची टाकी या दोन सोबत असते. मजुरांचा तुटवडा सध्या प्रचंड भासत आहे त्यामुळे वेळ, श्रम व पैसा यांची बचत करण्यासाठी तसेच अचूकपणे पूर्ण क्षमतेने काम होण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. ड्रोनद्वारे फवारणी व मिनी हार्वेस्टर द्वारे सोयाबीन काढणी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते. सदर प्रात्यक्षिकांच्या वेळी तालुका कृषी अधिकारी औसा संजय ढाकणे , कार्यालयीन कृषी अधिकारी तुकाराम भुसे , विकास लटूरे(भादेकर), कृषी पर्यवेक्षक रवी कावळे , कृषी सहाय्यक ओम अंधारे आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूरचे कीटकशास्त्रज्ञ संदीप देशमुख ,सचिन डिग्रसे ,कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे , सरपंच सिदाजी कदम, गणेश जाधव , पंडित कुलकर्णी , हनुमंत चामे ,मधुकर पंडगे विलास चामे,तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments