निटूर येथे शिवसंपर्क अभियानाला उत्सफुर्त प्रतीसाद
जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान राबवून सर्व शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पर्यंत पुरविण्यासाठी व अडीअडचणी मध्ये मदत करण्यासाठी एकत्रित राहून संपर्कात राहून मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठीच शिवसंपर्क अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबवावे व त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शाखाप्रमुख सहित जिल्हा प्रमुख प्रमुख पर्यंत सर्वांनी एकत्रित येऊन व संपर्कात राहून पक्षवाढ करण्याचे आदेश आल्यानुसार निटुर येथे शिवसंपर्क अभियानाची बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीला जनतेने व पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतीसाद दिला व गावातील विकास कामांच्या अडीअडचणी बोलुन दाखविल्या व या आम्हाला वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी लागणारी मदत व विकासकामांसाठी पाठपुरावे करणे गरजेचं असल्याचे या बैठकीत नागरीकांनी बोलुन दाखविले. यावेळी लातुर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे व उपजिल्हा प्रमुख व संगायो समिती सदस्य विनोद आर्य, तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी गावपातळीवरील निराधार लोकांना मदत, गाव विकास कामांसाठी लागणारी तालुका, जिल्हा पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व तसे प्रस्ताव प्रत्येक शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावे व अडीअडचणी आल्या तर आम्हाला संपर्क करा आम्ही तात्काळ मदत करुन ते कामे पुर्ण करुन घेण्यासाठी तत्पर मदत करण्याचे आश्वासन दिले. या शिवसंपर्क अभियानात जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे, जिल्हा महिला संघटक शोभाताई बेंजरगे, तालुका प्रमुख अविनाश रेशमे व युवासेना जिल्हाप्रमुख अँड. राहुल मातोळकर, उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब मिरगाळे व तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे याची उपस्थिती होती.


0 Comments