कोकळगाव,सरवडी येथे लातूर जिल्हा प्रमुखांनी घेतली शिव संपर्क अभियाना अंतर्गत बैठक
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शनिवार दि.17 जुलै रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव, सरवडी,मदनसुरी आदी गावांमध्ये शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी लातूर जिल्हा उपप्रमुख विनोद आर्य,माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, तालुका प्रमुख अविनाश रेशमे, औसा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती किशोर जाधव,जिल्हा युवा सेना सूरज दामरे,जिल्हा युवा प्रमुख राहूल मातोळकर,निलंगा तालुका संघटक शिवचरण पाटील,जिल्हा युवा उपप्रमुख दिनेश जावळे,माजी तालुका प्रमुख बालाजी माने,अण्णासाहेब मिरगाळे,प्रशांत वांजरवाडे,शेषेराव कुलकर्णी,आनंदराव आगलावे,डॉ.सचिन सगर , महेश वागना, बालाजी आगलावे, सुरेश लामतुरे,बालाजी सुर्यवंशी व्यंकट राजे,व रामतीर्थ,सांगवी, जेवरी, मुदगड एकोजी ,मदनसुरी आदी गावातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती. अविनाश रेशमे,विनोद आर्य यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना गावा गावात कशा प्रकारे राबविता येईल व शेतकरी व सामान्य माणसाच्या समस्या याबाबत मार्गदर्शन केले. लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पतेतून गाव तिथे संपर्क अभियानाच्या माध्यमातून गावागावात शासनाच्या योजना पोहचतात का? गावातील शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत,प्रत्येक गाव विकासापासून वंचित न राहता त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे याची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यामार्फत संग्रहित करून राज्य शासनाकडे देण्याचा व गाव तिथे शिवसैनिक तयार करण्याचे आवाहन केले. शिवाजी माने यांनी सरवडीमध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना अंतर्गत असलेला हेवेदावे बाजूला सारून शिवसेनेला शोभेल असे काम करण्याचा व गाव तिथे बाळासाहेबांना अभिप्रेत असा शिवसैनिक तयार करण्याचा प्रयत्न करण्याचे सडेतोड बोल सुनावले.
0 Comments