Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रामपंचायत कडून साथ रोग दक्षता म्हणून नाली उपसा स्वच्छता मोहीम

भादा ग्रामपंचायत कडून साथ रोग दक्षता म्हणून नाली उपसा स्वच्छता मोहीम


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील ग्रामपंचायतीने साथ रोग दक्षता म्हणून नाली उपसा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पूर्वी मोठ्या पद्धतीच्या नाल्या करण्यात आल्या होत्या यामुळे गावातील नागरिकांनी त्या नाल्यांमध्ये घरातील कचरा घाण टाकाऊ पदार्थ टाकून घाण नाल्या पूर्णपणे भरलेल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणी डासोत्पत्ती दुर्गंधी आदीबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे ग्रामपंचायत मध्ये याबाबत चर्चा होऊन उपसरपंच बी एम शिंदे आणि सदस्य सूर्यकांत उबाळे,अमोल पाटील यांनी पाहणी करून त्या भादा येथील गावातील ज्या मोठ्या नाल्या बांधकाम आहेत त्या स्वच्छता मोहीम म्हणून जेसीबी द्वारे या नाल्या उपसा करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी थांबणारे घाण पाणी आता थांबणार नाही आणि त्याठिकाणी साथीचे आजार पसरविणारे डास(मच्छर) निर्मिती होणार नाहीत अशी दक्षता ग्रामपंचायत कडून घेण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments