Latest News

6/recent/ticker-posts

औराद बाजार समिती संचालक मंडळा वरील आरोप बिनबुडाचे- अशोकराव पाटील निलंगेकर

औराद बाजार समिती संचालक मंडळा वरील आरोप बिनबुडाचे- अशोकराव पाटील निलंगेकर


निलंगा:(तालूका प्रतिनिधी/इरफान शेख ) औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे आहेत सर्व कामे परवानगी घेऊनच व पैसे हे नियमाप्रमाणे खर्च करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील आयोजित शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी औराद बाजार समितीचे सभापती हाजी सराफ, उपसभापती लक्ष्मण कांबळे, संचालक गंगाधर चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, संजय बडुरे, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लाला पटेल, हसन चाऊस आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,औराद शहाजनी बाजार समिती संचालक मंडळाने 16 लाख 37 हजार 698 रुपये पूर्णपणे नियमानुसार खर्च केले आहेत त्यात बाजार समितीच्या सहा लक्ष रुपयांची अंतर्गत रस्ते, 90 हजार पगारी, एक लक्ष रुपये तांबळे उपचारासाठी, एक लक्ष रुपये सेवक यांच्या मुलीच्या लग्ना साठी ऍडव्हान्स, एक लाख 28 हजार कर्मचारी विमा सहा लाख थकीत कर्मचारी पगार दिला गेला आहे. सर्व परवानगी घेऊनच सदरील रक्कम खर्च केले असल्याचे त्यांनी सांगितले मागील काळातीळ संचालक मंडळाने जवळपास सवाकोटी रुपये कशा प्रकारे खर्च केले याची ही चौकशी होणार आहे असे ते शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments