अल्पसंख्याक समाजाकडून आमदार अभिमन्यू पवार यांचे कासार सिरसी परिसरात भव्य स्वागत
कासार सिरसी:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) पद हे माध्यम असून ओबीसी, मुस्लिम तथा अल्पसंख्याक समाजाचे आरक्षण हे माझे ध्येय आहे, या विचाराने स्वतःच्या पदाची परवा न करता सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या आरक्षण मागणीचा आवाज सभागृहात उटवणारे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांचे कासार सिरसी परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात बहुचर्चित आरक्षणाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडणारे आमदार अभिमन्यू पवार यांचे अधिवेशनानंर प्रथमच या मतदारसंघातील 68 गावासह लिंबाळा, भुतमूगळी, हरिजवळगा, हासुरी आधी गावात आगमन झाले. त्यांचे मोटार सायकल रॅलीने भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कासार सिरसी येथील शिवाजी चौकात ओबीसी वर्ग, मुस्लिम व मराठा बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभास मदनसुरी, सरवडी, कासार बालकुंदा या महसूल विभागातून मोठा जनसमुदाय जमला होता. याप्रसंगी आमदार पवार म्हणाले की, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. यासाठी भाजपाच्या बारा आमदारांचीच निवड का केली असे सांगून ते म्हणाले की, सभागृहात विकासाच्या मुद्द्यावर सर्वाधिक प्रश्न विचारणारा मी एकमेव आमदार आहे, असे सांगत शेवटी ते म्हणाले की निलंबन म्हणजे कलंक नव्हे ! माझ्या कार्यावर जनतेने विश्वास ठेवावा. यापुढेही या मतदार संघातील सर्वच विकास कामे चालूच राहतील असे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी अजित माने, कल्पना ढविले, धनराज होळकुंदे, शिवकुमार चिंचणसुरे, भाजपा मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष जिलानी बागवानसह आदि कार्यकर्ते हजर होते. ग्रामस्थांच्यावतीने आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला.

0 Comments