Latest News

6/recent/ticker-posts

आ.धस हेच कोविड योद्यांचे खरे वाली- रामदास सोमवंशी

आ.धस हेच कोविड योद्यांचे खरे वाली- रामदास सोमवंशी 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) सरकारच्या दोन दिवशीय अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित झाले पण ज्या कोविड योद्यांनी कोविड-19 सारख्या महामारीत स्वतःचा व परिवाराचा विचार न करता पुढचं भविष्य काय होईल याच न विचार करता सेवा दिली या कोविड कर्मचाऱ्यांविषयी अधिवेशनात महाराष्ट्रातील एकमेव आ. सुरेश धस यांनी मुद्दा उपस्थित करून कोविड योध्याचा सन्मान केले असे उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथील कोविड योद्धा रामदास सोमवंशी(ईसीजी तंत्रज्ञ) यांनी सांगितले पुढे बोलताना सोमवंशी म्हणाले आम्ही सर्व कोविड योद्धा गेल्या वर्षांपासून कोविड बाधित रुग्णाची सेवा करत आहोत आणि पुढे करणार पण आहोत पण कोविड बाधित रुग्ण असले की आम्हाला ठेवत आहोत आणि रुग्ण संख्या कमी झाली की काढत आहोत असा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे गरज सरो वैद्य मरो अशाच प्रकारे चालत आहे आम्ही केलेल्या सेवेचा विचार करा असे कोविड योद्धा रामदास सोमवंशी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments