ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल निलंगा मध्ये आनोख्या पद्धतिने गुरुपोर्णीमा साजरी
निलंगा:{विशेष प्रतिनिधी/इरफान शेख} येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मध्ये आनोख्या पद्धतीने गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. सद्या करोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे संपुर्ण राज्यातील शाळा बंद आहेत. विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन ज्ञानदीप बालविहार आॕनलाईन च्या माद्यमातुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य गेल्या दिड वर्षापासुन करीत आहे. शिक्षणासोबतच अनेक उपक्रमाच्या माद्यमातुन चिमुकल्यांना कृतीशिल शिक्षण देण्याचे कार्य पण ज्ञानदीप च्या माद्यमातुन होत असते त्याचाच एक भाग म्हणुन आज शाळेत अतिशयअनोख्या पद्धतीने आॕनलाईन गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली यात शाळेतील शिक्षक वृंद,पालक,व विद्यार्थी सहभाग झाले होते. आई हेच प्रथम गुरु हे लक्षात घेत प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आई,वडील,आज्जी,आजोबा यांना छोटे फुल देऊन त्यांना वंदन करुन हा गुरु पोर्णीमा साजरी करण्यात आला या उपक्रमासाठी पालकांचा व विद्यार्थीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे संचालक मल्लिकार्जुन कोळळे,शिक्षक वृंद सौ.वैशाली मॕडम, सौ.जाजु मॕडम, सौ.संगीता मॕडम यांनी कार्य केले.

0 Comments