निटुर मधील बेशिस्त खाजगी वाहनांच्या पार्किंगमुळे एसटी महामंडळाच्या बसेसला होत आहे वाहतूकीसाठी अडचण
आगार प्रमुख यांनी दिले पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतला निवेदन
विशेष प्रतिनिधी/इरफान शेख
निलंगा: तालुक्यातील निटुर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे या गावातून नवीन होत असलेला जहीराबाद महामार्गाचे काम हे एका बाजूने पूर्ण झाले आहे त्यामुळे सर्व वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर पडत असल्याने खासगी वाहने बेशिस्तपणे महामार्गाच्या डिव्हायडर कडेने थांबत आहेत यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस ला फिरण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही परिणामी त्यांना बेशिस्त वाहतुकीचा व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बस फिरवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने निलंगा आगाराचे आगारप्रमुख युवराज थळकर यांनी निटूर पोलीस चौकी व येथील ग्रामपंचायत कार्यालय यांना निवेदन लिहिले आहे व त्या निवेदनात म्हटले आहे की सदर एसटी महामंडळाची गाडी हे निटूर गावामध्ये वळण्यासाठी खाजगी वाहनांची अडचण निर्माण होत आहे आपल्या गावांमध्ये खाजगी वाहने हे रस्त्याच्या आजूबाजूला कुठेही बेशिस्तपणे थांबत असल्याने एसटी बसला वाहतूक करताना अडचण होत आहे परिणामी बस फिरवायला जागा कमी पडत आहे तरी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन यांनी सहकार्य करून ही बेशिस्त वाहतुकीला शिस्त द्यावी व एसटी महामंडळाचा होत असलेला तोटा भरून काढण्यात महामंडळाची एका प्रकारे मदत करावी अशी मागणी निलंगा बस डेपोच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय निटूर व पोलीस चौकी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
0 Comments