Latest News

6/recent/ticker-posts

नळेगावात नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

नळेगावात नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य


नळेगाव:{ प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे } येथील प्रभाग 4 मध्ये नाल्या तुंबल्यामुळे नाल्याचे घाण पाणी पावसामुळे सर्व पाणी रस्त्यावर व घरात शिरल्यामुळे सर्व रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत आहेत. नळेगाव येथील प्रभाग चार मध्ये अनेक वर्षापासून ग्राम पंचायत विकासाची कामे केल्याचा गवगवा करत असून या प्रभागात एकही नाल्याचे काम नसल्यामुळे सर्व नाल्याचे पाणी रस्त्यावरून वहात असल्यामुळे व सध्या पावसाळा असल्यामुळे नाल्याचे सर्व पाणी रस्त्यावरून घरात शिरल्यामुळे सर्वत्र घाणच घाण पसरली असून या मुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या ग्रामस्थ कोरोनामुळे परेशान असून व शाळा चालू झाल्यामुळे कन्या शाळेच्या पाठीमागे ग्रामस्थ पिण्याचे पाण्याच्या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे मोठा खड्डा पडल्यामुळे त्याच खड्डयात नाल्याचे पाणी साचल्यामुळे दुर्गंधी सुटल्यामुळे या रोडवरून जाणे येणेची मोठी वर्दळ असून जवळच शाळा असल्यामुळे येथूनच विध्यर्थ्यांना जावे लागते येथेच बोअरचे पाणी असल्यामुळे ग्रामस्थ घाणीतूनच पिण्याचे पाणी घेऊन जातात. तरी ग्रामपंचायतीने लक्ष घालून कन्या शाळेच्या बाजूचे घाण साफ करून हा परिसर स्वच्छ करावे अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.



Post a Comment

0 Comments