Latest News

6/recent/ticker-posts

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित निलंग्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित निलंग्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) उद्या दि.29 गुरुवार रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.29/07/2021 रोजी सकाळी 7:00 वाजता स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व मातोश्री वत्सलबाई पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन व अभिवादन करण्यात येणार आहे सकाळी 7:30 वाजता ग्रामदैवत निलकंटेश्वर मंदिरामध्ये अभिषेक व 8:00 वाजता हजरत पीरपाशा दर्गा येथे चादर अर्पण व 8:30 वाजता हजरत दादापीर दर्गा येथे चादर अर्पण व 8:50 वाजता महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  अभिवादन व 9:10 वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आल आहे सकाळी 10:00 वाजता अशोक बंगला निलंगा येथे येणाऱ्या मान्यवरांचे भेटीगाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे असे अवाहन अशोकराव पाटील वाढदिवस समिती व अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments