निलंग्यातील रस्त्यावरील खड्ड्यात मनसेने घातली अंघोळ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील रस्ते गेली एक वर्षांपूर्वी नळ दुरुस्ती नावाखाली उखडून ठेवली आहेत त्यांची अद्याप दुरुस्ती न केल्याने रस्त्यावर फक्त खड्डे नाही तर मोठ मोठी डबके बनली आहेत याचा निषेध नोंदवत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांनी खड्ड्यामध्ये लहान मुलाला बसवून अंघोळ घातली व ही रस्ते दुरुस्ती नाही झाली तर खळखट्याक आंदोलन करू असा इशारा दिला. शहरात पाणी कुठे,रस्ता कुठे व खड्डे कुठे हे लक्षात न येऊन अश्या वर्षभरापासून नादुरुस्त असलेल्या रस्त्यांवर वाहनधारक, जनता पडत आहे,अपघात होत आहेत तरीही निधी नाही हे नगरपालिकेत गेल्यावर एकमेव उत्तर मिळते मग हा निधी नेमका कोणाच्या घशात जातो हा प्रश्न उपस्थित करत डॉ.भिकाणे यांनी नगरपालिकेला रस्तेदुरुस्तीसाठी पंधरा दिवसांचे अलटीमेटम दिले आहे. निलंगा नगरपालिका हे नगराचे पालन करत नसून नगर भक्षक बनली आहे कारण नगराध्यक्ष हे लोकप्रतिनिधी यांच्या हातचे चावीवर चालणारे शोभेचे बाहुले आहेत ज्यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असाही आरोप मनसेने केला. निधीच नव्हता तर संपूर्ण शहरातील रस्ता का उखडला व वर्षभर लोकांना धुळीच्या साम्राज्यात का ढकलले असा प्रश्न डॉ.भिकाणे यांनी उपस्थित करत या पावसाळ्यात जनतेला नगराध्यक्ष यांनी आता खड्ड्याच्या दरी मध्ये लोटून दिले आहे असा आरोप केला. शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी जनतेला होणाऱ्या त्रासाची जिम्मेदारी घ्यावी व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावरील खड्ड्यात खड्ड्याच्या खोलीचा अंदाज यावा म्हणून बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा डॉ.भिकाणे यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,उपाध्यक्ष नजीर मुजवर,कृष्णा जाधव,प्रदीप शेळके,अबू बकर ,बाबलसुरे, कांबळे जीवन आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments