केळगाव काँग्रेसतर्फे सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंकज शेळके यांचा सत्कार
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील राठोडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पंकज मारुतीराव शेळके यांची लातूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे केळगाव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज निलंगा येथे सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, केळगाव गावचे माजी सरपंच शकील पांढरे, ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी, फारुख पांढरे, हुजूर मुजावर, किसन पाटील, रावण कांबळे, गोपाळ राठोडकर, भिकाजी कांबळे, महम्मद डाळिंबकर ,रफिक पांढरे, आसीम पांढरे, शिवाजी सूर्यवंशी, सह पत्रकार जावेद मुजावर यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य राठोडा गावचे लोकनियुक्त सरपंच पंकज शेळके यांची सरपंच सेवा महासंघाच्या लातूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सर्वांच्या शाल फेटा श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पंकज शेळके म्हणाले की आता संपूर्ण जिल्ह्यातील सरपंचाची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडले आहे त्यांच्या अडीअडचणीला धावून त्यांच्या समस्या दूर करण्याचे मी प्रयत्न करून सेवा संघाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे असे म्हणाले प्रास्ताविक जावेद मुजावर यांनी केले तर आभार पंकज शेळके यांनी मानले.
0 Comments