Latest News

6/recent/ticker-posts

कर्तबगार फोटो जर्नलिस्ट दानीश सिद्दीकी यांचे निधन

कर्तबगार फोटो जर्नलिस्ट दानीश सिद्दीकी यांचे निधन


वृत्तसंस्था: पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, जेथे एकीकडे पत्रकारितेची बदनामी होत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे दानिश सिद्दीकी यांच्यासारखे तरुण सक्षम पत्रकार आहेत, जे एक उदाहरण बनले  सर्वात लोकप्रिय ठरला तो फोटो दिल्ली गोपाल शर्मा चे चित्रीकरण दानिश सिद्दीकी हे एक कर्तबगार फोटो जर्नलिस्ट होते. त्यांचा कॅमेरा सर्वस्वी होता प्रेम जिव्हाळा, स्नेह, छंद, कँमेरा होता 16 जुलै 2021 रोजी अफगाणिस्तानात(कंधार) येथे ते काम करीत असताना त्यांची हत्या करण्यात आली. यांचा जन्म 1980 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला.  त्यांच्या वडिल प्रा.अख्तर सिद्दीकी जामिया मिलिया इस्लामियामधून निवृत्त झाले आहेत. याशिवाय अख्तर सिद्दीकी हे नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनचे (एनसीटीई) संचालकही आहेत. दानिश सिद्दीकी यांनी आपले शिक्षण दिल्ली येथील केंब्रिज स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर, दानिश सिद्दीकी यांनी प्रथम जामिया मिलिया इस्लामिया येथून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली आणि त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून जनसंपर्क विषयांत पदव्युत्तर पदवी(पोस्ट ग्रॅज्युएशन) पूर्ण केले आणि टीव्ही बातमीदार म्हणून करिअरची सुरूवात केली.  यामुळेच त्यांना फोटो जर्नलिस्ट म्हणून करिअर करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी २०१० साली आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून काम करण्यास सुरवात केली. जेव्हा दानिश सिद्दीकीने कॅमेर्‍याने फोटो काढण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांची छायाचित्रे पसंत होऊ लागली. दानीश सिद्दीकी यांनी आपल्या कारकीर्दीत 2015 मधील नेपाळचा भूकंप, 2016-17 मधील मोसुल युद्ध, रोहिंग्या नरसंहार आणि हाँगकाँग शरणार्थी , निर्वासित संकट पाहिले आहे.  या शिवाय सन 2020  मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या वेळीही दानिश सिद्दीकीची छायाचित्रे बरीच चर्चेत होती. दिल्ली दंगलीच्या वेळी जामियाजवळ गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीला गोळीबार करताना दानिश सिद्दीकी यांनी हे चित्र काढले होते. हे चित्र त्या वेळी दिल्लीतील दंगलींपैकी एक सर्वाधिक चर्चेत होते. दानिश सिद्दीकी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतातील रॉयटर्स पिक्चर्स टीमचे प्रमुखही बनले. दानिश सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. दानिश सिद्दीकीला सहा वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. पुलित्झर पुरस्कार रॉयटर्स संघाला रोहिंग्या निर्वासित समस्येवर फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला. दानिश सिद्दीकी हेसुद्धा या संघात होते. पत्रकारितेच्या जगासाठी रोल मॉडेलपेक्षा काही कमी नव्हते. आपल्या परिश्रम आणि समर्पणाने तो सतत यशाच्या उंचावर स्पर्श करीत होते. अफगाणिस्तानातील युद्धाचे चित्रिकरण करायला गेले आणी आपल्या कामादरम्यान, दानिश सिद्दीकीवर कंधारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात तालिबान्यांनी हल्ला केला. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

"मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments