कै.नरसिंगराव चव्हाण विद्यालयाचा 100%निकाल
नळेगाव: येथील कै.नरसिंगराव चव्हाण विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागला असून कु.गव्हाणे आदित्य भिवाजी 100%,कु.ढोले रामेश्वर चंद्रशेखर 95.80%,अलुरे अक्षरा नरसिंग 94.20%,उजळंबकर मयूर श्याम 93.60% गुण घेऊन यश संपादन केले आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 81 विध्यार्थी बसले होते त्यापैकी 52 विध्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर 30 विध्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.या वेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत नरसिंगराव चव्हाण,सचिव सविता चव्हाण,उपाध्यक्ष संभाजी भालेकर, जयराम गट्टेवार,नारायण मुंजाने,कैलास चव्हाण व तसेच विद्यालयाचे मु.अ. सी.व्ही.चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

0 Comments