माळी सेवा संघ,महाराष्ट्रच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी विठ्ठल चांबर्गे
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) दि.24 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माळी सेवा संघच्या वतीने माळी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकरजी वाघमारे व माळी सेवा संघाचे सरचिटणीस भारतजी काळे, सदस्य सुरेंद्रजी तिडके यांनी सन्माननीय दयानंदजी चोपणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते विठ्ठल चांबर्गे यांची माळी सेवा संघ, महाराष्ट्रच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माळी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य सदस्य दत्तात्रय दापके, अभिमन्यू पाखरसांगवे, मु.अ. मोहन नटवे, विजय पेटकर, प्रा.राम पेटकर, माधव पेटकर, ज्ञानोबा वाघमारे, स्वप्नील वाघमारे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments