कोकळगाव मध्ये अवैध धंद्यांना ऊत
मदनसुरी:(प्रतिनिधी/ द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव सह परिसरात मागील सहा महिन्यांपासून अवैध धंदे बहरले असल्याने संबंधित अधिकारी मात्र याकडे पूर्णतः कानाडोळा करत असल्याचे जनतेद्वारे बोलले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील कोकळगाव सह,सरवडी,मदनसुरी, आदी परिसरात दारू,गुटखा,मटका,जुगार असे अवैध धंदे बहरले असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेद्वारे संताप व्यक्त केले जाते आहे.लॉक डाऊन आणि महागाईमुळे गोरगरीबांच्या संसाराचे आर्थिक बजेट कोसळल्यामुळे एकीकडे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे,तर दुसरीकडे परिसरातील तरुणाई मध्ये व्यसनाधीनता वाढत चालल्याने विशेषतः महिला भगिनींमध्ये संतापाची लाट निर्माण होते आहे.गुटखा मानवाच्या आतील भागातील अवयवांस कर्करोग होतो,त्यामुळे मानवाचे जीवन उध्वस्त होते. गावात गुटखा पान टपरी,किराणा दुकानात उघडपणे विक्री केली जाते आहे,अनेक माणसाच्या हाताला काम नसल्यामुळे घरातून बायकोला मारून भांडण करून पैसे आणून मटका खेळणे व गुटखा खाणे असे बिनउद्योगी धंदयांचे प्रमाण वाढल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. किराणा दुकानाच्या नावाखाली सुगंधित जर्दा, विमल गुटखा आदींचे स्वतःच्या मालवाहतूक वाहनाद्वारे खुलेआम राजरोजसपणे परिसरातील गावामध्ये विक्रीचा व्यवसाय तेजीत चालू आहे .अन्न भेसळ,व औषध प्रशासन पथकानीं ग्रामीण भागात पाठ फिरवल्याने सदर धंद्यांना ऊत आल्याचे बोलले जाते आहे.गल्लोगलीत चौका चौकात व्यसनाच्या आहारी जाऊन बेशिस्त जीवन जगण्याचे प्रमाण तरूणाई मध्ये दिसून येते आहे.या अवैध धंद्यांना बळ कोणाचे? पोलीस प्रशासन की कमजोर संबंधित अधिकारी? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

0 Comments