Latest News

6/recent/ticker-posts

मौजे बोंबळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापरिसरातील अतिक्रमणाबाबत तहसीलदार यांना निवेदन

मौजे बोंबळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापरिसरातील अतिक्रमणाबाबत तहसीलदार यांना निवेदन


देवणी:(प्रतिनिधी विक्रम गायकवाड) मौजे बोंबळी तालुका देवणी जि.लातूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापरिसरात गावातील काही जातीवादी लोकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे, तसेच येथील बौद्ध युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे व येथील बौद्ध समाजाचं या जातीयवादी गावगुंडाकडून संरक्षण करण्यात यावे याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) आय.टी.सेल जि.लातूर च्या वतीने देवणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले,यावेळी आमच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर 12 ऑगस्ट 2021 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आय.टी.सेलचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांनी मिडियासमोर बोलताना दिला.यावेळी रिपाई(आ)देवणी शहराध्यक्ष मा.विक्रम गायकवाड,विठ्ठल गायकवाड सह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments