Latest News

6/recent/ticker-posts

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्याची आंतरमशागतीसाठी जोरदार धावपळ

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्याची आंतरमशागतीसाठी जोरदार धावपळ 


बी डी उबाळे

औसा: खरीप 2021-22 च्या हंगामासाठी यावर्षी मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने जमिनीत पेरणी योग्य ओलावा असल्याकारणाने काही शेतकऱ्यांनी मृग व आर्द्रा नक्षत्रामध्ये दोन टप्प्यांत पेरणी केली. कोरोणा  विषाणूच्या संक्रमण रोखण्यासाठी याही वर्षी लॉकडाऊन करण्यात आला होता.या तीन महिने लॉकडाऊनमुळे  कसल्याही प्रकारचे प्रदूषण न झाल्यामुळे यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला असावा अशी चर्चा सुरू असून सध्या तरी पिकाची परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे शेतीतील अंतर मशागतिला शेतकरी वर्ग लागला आहे. अधून-मधून पडलेल्या पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत झाल्याने कोळपणी खुरपणी तन नाशक फवारणी व कीटकनाशक फवारणी करत असून शेतीतील कामास वेग आला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे जनावरांना चारा व पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी  सध्यातरी मिटला आहे. वाढत्या महागाईमुळे खुरपणी साठी 200 ते 250 रुपये मजुरी शेतकऱ्यांना मोजावी लागत असून उत्पादनाचा खर्च वाढत आहे.तालुक्यातील जवळपास एक लाख पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.यावर्षी शेतकऱ्यांना काही जास्तीचा पाऊस लागल्याने पिकांचे नुकसान झाले असून जागेवर पिकांची नासाडी मुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले  असून तालुका कृषी अधिकारी मार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील  सोयाबीनच्या पिकाचे पंचनामे सुरू आहेत. तक्रारी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यात आले परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र मिळणार कधी असा सवाल शेतकरी करत आहेत. सोयाबीन सह तूर, मूग उडीद संकरित ज्वारी सूर्यफूल भुईमूग अशा अनेक पिकांची पेरणी झाली आहे. सोयाबीन मूग उडीद या पिकावर कीड व आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून कीटक नाशक फवारणी करून शेतकरी सर्व पिकांचे संरक्षण करीत आहेत. तसेच पिकांची वाढ चांगली व्हावी म्हणून खुरपणी,कोळपणी व पीक वाढीचे विविध प्रकारचे औषध फवारणी करीत शेतकरी आंतरमशागतीची मध्ये गुंतला आहे.

दिनांक 25/07/2021 रोजीचे मंडळनिहाय पर्जन्यमान

(मी.मी.मध्ये) तालुका औसा      

 मंडळ         आजचे          एकूण   

  विभाग      पर्जन्यमान

1)  औसा        00         (298)

2)  भादा         00          (224)

3)  किल्लारी    00         (378)

4)  लामजना   00           (341)

5)  मातोळा      00         (437)

6)  किनीथोट    00        (397)

7)  बेलकुंड.      00        (347) 

आजपर्यंतचे एकूण पर्जन्य 2318 mm.

आजपर्यंतचे सरासरी पर्जन्य 331.14

यावर्षी असा आणखी समाधानकारक पाऊस झाला तर शेतकरी वर्गाला चांगले उत्पन्न मिळू शकेल म्हणून आर्थिक अडचणी असतानाही खाजगी कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी खरीप पिकाची अंतर मशागत करण्यासाठी जोमाने सरसावत असून औसा तालुक्यात बहुतांश शेतकरी पिकाच्या आंतर मशागतीसाठी राबत आहेत.

Post a Comment

0 Comments