रात्री उशिरा पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्या घरावर दगडफेक; निलंगा तालुक्यातील घटना
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यांतील कोकळगाव येथील पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दगडफेक करून पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे अनेक वर्षांपासून अवैध धंदे जोमाने चालतात. दारू, गुटखा, मटका, जुगार, अवैध पेट्रोल विक्री, अवैधरीत्या वाळू साठवण करणे ,अशा विविध अवैध धंद्याचे साम्राज्य वाढले असून समाजाचे स्वास्थ्य बिघडत चालले असल्याने या अवैध धंद्यामुळे तरूणाई नेस्तनाबूत होत असतानाचे स्पस्ट चित्र कोकळगाव परीसरात जाणवू लागले आहेत आणि या अवैध धंद्याची बातमी प्रकाशित झाल्याची कळताच अवैध धंदेवाल्यानी संगनमत करून पत्रकारविरोधी भडकावणे, त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना बदनाम करणे असे प्रकार प्रलोभनकारी व्यक्तीच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. जवलंत पत्रकारितेला धार आखूड करण्याचा प्रकार या परिसरात पहावयास मिळते आहे.अशा अवैध धंदेवाल्याविरुद्ध कडक कारवाई करून सदर अवैध धंदेवाल्याविरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुजाण नागरिकाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकार कोळी कुटुंबीय भयभीत
पत्रकार द्रोनाचार्य कोळी यानी दिलेल्या बातमीवरून त्यांच्या राहत्या घरावर दगडफेक झाल्याने पत्रकार कोळी कुटुंबीय भयभीत अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात सामान्य माणूस पञकार उठाव करताच त्यांच्यावर हे लोक पैशाच्या जोरावर हल्ले करत आहेत. नेमके या अवैध धंदेवाल्यांना कोणाचे अभय आहे. अशी चर्चा होत आहे.

0 Comments