मदनसुरी,कोकळगाव परिसरात सर्दी,खोकला, तापीचे रुग्ण
मदनसुरी:( प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी ) संमिश्र वातावरण बदलामुळे निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कोकळगाव सरवडी, मुदगड एकोजी आदी ग्रामीण परिसरात अज्ञात साथीमुळे सर्दी, खोकला, ताप, डोके दुखणे आदी लक्षणे असलेल्या आजाराचे अनेक रुग्णामध्ये दिसून येत आहे. गावामधील सार्वजनिक वापरात असलेल्या पाण्याची तपासणी होणे अत्यावश्यक आहे. पाणी निर्जंतुकीकरनासाठी पावडरचे वापर करणे अत्याश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला, डोके दुखणे आदी आजारावर गावातील आरोग्य वर्धिनी केंद्रात औषध गोळ्या उपलब्ध करून उपचार केले जावे अशी मागणी जनतेद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

0 Comments