राहुल बहुरे यांची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पुरस्कारासाठी निवड
पोलीस खात्यातील प्रतिष्टेचा पुरस्कार
औसा: ठाण्याचे एपीआय राहुल बहुरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मेडलचा मान मिळाला आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस खात्यातील प्रतिष्टेचा पुरस्कार 2021 साठी गुन्ह्याची चौकशी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे गृह मंत्रालयाच्या वतीने "इन्वेस्टीगेशन अवार्ड"साठी त्यांची निवड झाली आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. राहुल बहुरे हे औसा पोलीस ठाण्यांमध्ये एपीआय म्हणून कार्यरत असताना औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. तसेच कोरोना संकट काळातही त्यांचे काम कौतुकास्पद होते. या कामाची दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालय वतीने देण्यात येणारा यावर्षीचा "इन्वेस्टीगेशन अवॉर्ड" साठी त्यांची निवड झाली असल्याचे दिनांक 12 ऑगस्ट 2021रोजी च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव डि के घोष यांनी जाहीर केले आहे आणि ए पी आय राहुल बहुरे यांना कळविले आहे. यामुळे राहुल बहुरे यांचे अभिनंदन सर्व स्तरातून केले जात आहे.

0 Comments