महाआवास अभियान मध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून निलंगा पंचायत समितीचा शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सन्मान
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाआवास अभियान कालावधी मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण या दोन्ही योजनांमध्ये पंचायत समिती निलंगा ने उद्दीष्टनुसार घरकुल पूर्ण करण्यामध्ये दोन्ही प्रकारात जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांक मिळवला आहे याचा सन्मान म्हणून जिल्हास्तरीय मुख्य शासकिय ध्वजारोहण समारोहात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांचे हस्ते पंचायत समिती, निलंगा यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पंचायत समितीच्या वतीने सदरचे मानचिन्ह उपसभापती अंजली राजा पाटील आणि उपअभियंता गंगथडे यांनी स्वीकारले.
0 Comments