शिरोळ-वांजरवाडा ते निटूर(मोड) रस्ता दुरुस्त करावा अन्यथा नेत्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवू- रमेश लांबोटे
शिरोळ:(प्रतिनिधी/सलीम पठाण) निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा ते निटूर(मोड) या नऊ किलोमीटर डांबरी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडले आहे यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहनधारकांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा लोकप्रतिनिधीच्या गाडी समोर काळे झेंडे दाखवले जातील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांनी दिला आहे. निलंगा तालुक्यातील निटुर मार्गे नऊ किलोमीटरचा शिरोळ वांजरवाडा मार्गे वलांडी जाणारा रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. डांगेवाडी, कलांडी, दत्ता पाटी ते वांजरवाडा पर्यंत रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना या रस्त्याचा अंदाज लागत नाही. रात्र अपरात्री रुग्णांना रुग्णालयात जात असताना व प्रसूती मातांना या रस्त्यावरून जात असताना अतिशय त्रास होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न शिरोळ वासियांना पडला आहे. मतदानाच्या पुढे येऊन मतदार मागणारे जिल्हा परिषदचे सदस्य आमदार हे आता इकडे फिरकतही नाहीत लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा लोकप्रतिनिधीच्या गाड्या अडवून काळे झेंडे दाखवले जातील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांनी दिला आहे.
0 Comments