कोकळगाव मध्ये नागरिकांना दिले कोविड लस
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शनिवार दि.14 ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात अठरा वर्षापुढील नागरिकांना कोविड शिल्ड लस देण्यात आली. यावेळी शंभर डोस देण्यात आले असून, लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. लसीकरण व्यवस्थेसाठी कोकळगाव उपआरोग्य केंद्रातील डॉ.अभिजित रुमने, एम.पी.डब्ल्यू.जीनेंद्र देवसाळे, सिस्टर छाया जाधव, आरोग्य सेविका कमलबाई सुर्यवंशी, आशा वर्कर चमाबाई सुर्यवंशी, यास्मिन शेख आदींनी परिश्रम घेतले. गावातील लसीपासून वंचित राहिलेले नागरिकांनी पुढच्या टप्यात ही लस घेण्याचे आवाहन आरोग्य वर्धिनी केंद्र कोकळगाव च्या वतीने करण्यात आले.
0 Comments