पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्याकडून निलंग्यातील ऑक्सिजन निर्मिती युनिटची पाहणी
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) कोविड-19 ची संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरविण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात 70 लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या लिक्विड ऑक्सीजन निर्मिती युनिटची पाहणी आज शुक्रवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी केली. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा व पुरेसे मनुष्यबळ,औषधे व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून ठेवावीत असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित अधिकारी यांना दिले. कोरोना प्रादुर्भाव काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी याप्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे, डॉ.प्रल्हाद सोळंके, डॉ.दीपक हुग्गे, डॉ.मौला शेख, डॉ.रुपेश काळे, डॉ.कोडगी , डॉ.शहाबाज वाढवणे , डॉ.प्रगती शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सचिन दाताळ, लिंबन महाराज रेशमे, बाळू सोमाणी, प्रवीण सूर्यवंशी व उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील मेट्रोन अरुणा सोनार, भाग्यश्री काळे, यास्मिन मुल्ला, छाया दाडगे, अंजुम सौदागर, मोनिका पांढरे, निर्मला निंबाळकर, माने, सविता कलबोने, अतुल शिंदे,पांडुरंग नागिम, ढेपे, पठाण, संभाजी घुले ,जगताप दादा, रामेश्वर श्रीमंगले, शिवाजी दूधभाते, दिनेश फुलारी, आशिष माने, लक्ष्मण फुलसुंदर, संकेत सुरवसे, भोसले सुमेध, शिवाजी चव्हाण, अतिक शेख यांच्यासह नर्स व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


0 Comments