कोरोनाच्या संकटांना दूर कर,म्हणत सुवासींनीने नागराजास पूजिले
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. समग्र प्राणिमात्राकडे भावयुक्त नजरेने पाहण्याचा व त्यांना जोपासण्याचा संदेश देणारा सण म्हणजेच नागपंचमी होय. या सणांना अध्यात्मिक महत्वही आहे. पाच युगापूर्वी सत्येंशवरी नावजी एक कनिष्ठ देवी होती. सत्यशावर हा तिचा भाऊ. सत्यशावराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशीच झालेला होता, नागपंचमीच्या दिवशी नागराजाच्या रुपात तिचा भाऊ दिसला आणि तिने नागराजास् भाऊ मानून पूजन केले. त्यावेळेसच नागराजाने तिला वचन दिले,जी बहीण भाऊ म्हणून नागपंचमीच्या दिवशी माझे पूजन करेल त्याचे रक्षण मी नक्की करेन आणि त्यामुळेच प्रत्येक स्त्री प्रत्येक महिला नागराजाला भाऊ संबोधून त्याची मनोभावे पूजाही करतात. भावांच्या जीवनातील संकटांना दूर कर, त्याला दिर्घआयुष्य लाभू दे त्याला प्रत्येक दुःखातून सावर ! स्वतःच्या रक्षणाची भाऊ च्या रुपात कवच असू दे! व जगांतील कोरोनाच्या संकटांना दूर कर अशी मनोभावे प्रार्थना सुवासींनीने नागराजास् केले.ग्रामीण परिसरात नागपंचमीच्या दिवशी झाडाला झुलनारे झोके झुलताना दिसत होते. नागपंचमी निमित्त नटून थटून महिला भगिनी पारंपारिक फेर धरून भुलाई गीत गाण्याचे प्रकार ग्रामीण परिसरात आजही पहावयास मिळतात. गौराई मातेची पूजा करणे गौराई मातेची मिरवणूक काढून तिचे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करतात.

0 Comments