Latest News

6/recent/ticker-posts

रस्ते,लाईट दुरुस्ती करण्याची एम आय एम ची मागणी

रस्ते,लाईट दुरुस्ती करण्याची एम आय एम ची मागणी


औसा: दि. 13 - AIMIM च्या वतिने निवेदन औसा नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.औसा शहरातील नगर परिषद ते पावरहाऊस, किल्ला समोरून जुना पोस्ट आॕफीस ते निलंगा वेस  व निलंगा वेस ते केदारनाथ मंगल कार्यालापर्यंत व शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. सद्दया पावसायाचे दिवसअसल्यामुळे खडयात मुरुम व कच खडी टाकुन तात्पुर्ति दुरुस्ती करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले. तसेच शहरात बर्याच ठिकाणी सिट्र्ट लाईट बंद आहेत ते त्वरीत चालु करण्यात यावेत. असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर एम आय एम औसा तालुका प्रभारी अफसर शेख, मुखतार कुरेशी, सय्यद उस्मान, अखील शेख, समद शेख, नजीब शेख, व इतर जणांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments