Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता सतर्क राहावे

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता सतर्क राहावे


चाकुरात आढावा बैठक तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या विभाग प्रमुखांना सूचना

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना आपण समर्थ पणे केलेला आहे.संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने दर्शविल्याने प्रशासकीय यंञणा सतर्क करण्यासाठी चाकुर तालुक्यात चाकुरचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी बैठक घेतली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाने सतर्क राहावे. विद्यार्थ्याच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाची लाट येणार नाही. यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, निष्काळजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी येथे दिला. चाकूर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. डॉ. बिडवे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहाणे बंधनकारक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहाणे बंधनकारक आहे. यापुढे अपडाऊन जमणार नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने तत्पर राहायचे आहे. जे अधिकारी, कर्मचारी यापुढे मुख्यालयी राहणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला. जे अधिकारी, कर्मचारी अपडाऊन करतात, त्यांची जबाबदारी कार्यालयीन प्रमुखावर राहील, असेही तहसीलदार डॉ. बिडवे यांनी सांगितले.लाटेत आरोग्य प्रशासनाने घेतलेली अथक मेहनत घेतली ही कौतुकास्पद आहे. आता कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता प्रत्येक विभागाच्या प्रशासनाने सतर्क राहावे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत.विद्यार्थी खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे. बहुतांश लोक मास्कचा वापर करत नाहीत. त्यांच्यावर नगरपंचायत, ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव तालुक्यात होता कामा नये. यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. बिडवे यांनी केले. बैठकीस गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, प्राचार्य शेषराव धोंडगे आदीसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, तिसरी लाट लक्षात घेता सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

Post a Comment

0 Comments