नळेगाव येथे नारायण राणे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना नळेगाव च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल नारायण राणे यांच्या प्रातिमात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. यावेळी नळेगावचे उपसरपंच रवी शिरुरे, दत्ता बिराजदार, दिगंबर बिराजदार शिवसेना शहर अध्यक्ष शंकर शेलार, युवा सेनेचे वैभव पाटील, दिगंबर तांदळे, बबलू शेलार, संदेश शेलार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments