Latest News

6/recent/ticker-posts

मांचरटवाडी येथील रस्त्यावर पडले खड्डे वाहनधारकांना करावी लागत आहे कसरत

मांचरटवाडी येथील रस्त्यावर पडले खड्डे वाहनधारकांना करावी लागत आहे कसरत


निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) निलंगा तालुक्यातील मांजरटवाडी येथे मुख्य रस्त्यापासून ते गावातील तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना वाहतूक करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यानंतर खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने परिणामी वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे दोन दिवसाखाली परिसरामध्ये पाऊस पडल्यामुळे खड्ड्यात पाणी साचले होते अनेक दुचाकीस्वार याचा अंदाज न लागल्यामुळे येथे पडले आहेत तरी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ पंकज भालके व आनंद टमके, दत्ता नागीमे, राजू पाटील, सतीश भदरगे, वैभव कवटकर, भास्कर भालके यांनी संबंधित प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

0 Comments