लातूर जिल्हा भाजपा सचिव पदी पंकज कुलकर्णी यांची निवड
निटूर: मा. पालकमंञी तथा विद्यमान आ. संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचे विश्वासू समजले जाणारे तसेच अनेक वर्ष रा. स्व. संघाचे कार्य केलेले व सध्या भाजपा मध्ये सक्रीय असलेले निटूर ता. निलंगा येथिल प्रगतीशील शेतकरी पंकज कुलकर्णी यांची लातूर जिल्ह्याच्या भाजपा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पञ लातूर जिल्ह्याचे भाजपा चे अध्यक्ष तथा आ. रमेश अप्पा कराड यांनी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये दिले. यावेळी मा. समाज कल्यान सभापती संजय दोरवे, संगमेश्वर करंजे, राम साळूंके, विजय देशमुख यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कुलकर्णी यांनी अनेक वर्ष संघाचे कार्य केले आहे आता ते भाजपा मध्ये सक्रीय आहेत त्यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाल्याने निटूर मध्ये फटाके फोडून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले कुलकर्णी यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Comments