Latest News

6/recent/ticker-posts

हजरत ढोलाशावली कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल उत्साहात

हजरत ढोलाशावली कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल उत्साहात


निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा गावातील हजरत ढोलाशा कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल दि. 22 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धानोरा गावातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हजरत  ढोलाशा कादरी दर्गा धानोरा शरीफ़ ओळखले जाते गावातील प्रत्येकाची श्रद्धा असलेले श्रद्धास्थान आहे. सज्जादे नसिन सय्यद असिफ कादरी यांच्या देखरेखीत(सरपस्ती) सय्यद नूरल्ला कादरी यांचा मुलगा सज्जादे नसीन सय्यद अयान कादरी यांचे हस्ते संदल चढवण्यात आले. संदल चढवल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सय्यद असिफ कादरी, रशिद शेख, गुलबर्गा येथून आलेले मुक्तार अहेमद, अश्रफ खानसाब, डॅनिश सिद्धीक झैन, सय्यद उमेर, सय्यद रशिदअलवी, अफरोज अलवी, पत्रकार अफसर शेख, सय्यद हाजीअली कादरी, सरदार शेख, सादकअली मुजावर, इम्रान शेख, अलीम शेख, हुसेन पठाण , आयुब पठाण, इस्माईल काळे, दीपक कांबळे, सलाउद्दिन मोमीन, सोहेल मोमीन, समीर मोमीन, सय्यद फराजअली कादरी, जावेद शेख, इर्शाद पठाण, इरफान शेख व गावातील नागरिक महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments