Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे वीज पडून गायीचा मृत्यू

भादा येथे वीज पडून गायीचा मृत्यू


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे मध्यरात्री झालेल्या पावसाने वीज पडून गोठ्यातच बांधलेल्या गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. औसा तालुक्यातील भादा येथील यादव बाबू लुंगसे यांची गाय शेतामध्ये बनलेली असता मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे दीड वाजल्या पासून पावसास सुरुवात झाली, यामध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने या कडकडाटामध्येच वीज कोसळली असून अंदाजे पन्नास हजार किमतीची गाय मृत्यू पावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत भादा तलाठी राम दूधभाते यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात शेतकऱ्याला मदत मिळणे कामी दाखल केल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments