स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकरच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्राच्या राजकारणातला एक शुचिर्भूत नेता ,स्वच्छ चरित्राचे धनी , नितीशील विकासपुरुष ,उच्च विचार आणि विकासाचा धगधगता अग्निकुंड असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त काँग्रेसचे शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे , निलंगा विधानसभा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष असगर भाई अन्सारी व रो.ह.या कमिटीचे शासकीय सदस्य सिद्धेश्वर बिराजदार बसपूरकर यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आदी जण उपस्थित होते.


0 Comments