Latest News

6/recent/ticker-posts

"थोडेसे माय बापासाठी पण" उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मध्ये आयोजित दूरदृष्टी प्रणाली बैठक

"थोडेसे माय बापासाठी पण" उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मध्ये आयोजित दूरदृष्टी प्रणाली बैठक


बी डी उबाळे

 औसा: तालुक्यातील भादा येथे थोडेसे 'मायबापा साठी पण'हा उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना दूरदृष्टी प्रणाली द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व आशा कार्यकर्ती ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते,संदर्भीय विषयी थोडेसे "माय बापासाठी पण"या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये आधारवड या संकेतस्थळाद्वारे लातूर जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ते, केंद्रचालक यांचे मार्फत करण्यात आले आहेत. त्याबाबत जेष्ठ नागरिक सर्वेक्षण फॉर्म कसा भरायचा याबाबत उपरोक्त कर्मचाऱ्यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बदलतील आपल्या आधीनिस्त ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी कार्यकर्ती,आशा कार्यकर्ती ,केंद्र चालक यांनी सदरील प्रशिक्षण एकत्रित उपस्थित राहून घेतले असून सर्व सूचनांचे पालन करण्यात आले आहे यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या,ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments