Latest News

6/recent/ticker-posts

भादा जुने गाव जिल्हा परिषद शाळा रस्ता होतोय अतिक्रमणमुक्त

भादा जुने गाव जिल्हा परिषद शाळा रस्ता होतोय अतिक्रमणमुक्त


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला रस्ता गेल्या अनेक वर्षापासून जुने गाव शाळेजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते ते अतिक्रमण काढण्याचे काम आणि नाली बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून या ठिकाणी अतिक्रमण काढून नाली बांधकाम सुरू आहे. भादा ग्रामपंचायत सतत या कामाचा पाठपुरावा करून हा रस्ता अतिक्रमणमुक्त केला जात आहे. याकामी या गल्लीतील रहिवाशी बालाजी गवळी, योगेश शिवलकर, गोपाळ शिंदे, अविनाश मोहिते, दत्ता पांचाळ, हणमंत दरेकर यांनी चांगल्या रीतीने ग्राम पंचायतला सहकार्य करून हे अतिक्रमण काढले आहे. यामुळे या ठिकाणाहून यापूर्वी एक वाहन जाणे कठीण होते याठिकाणी आता दोन वाहने सहज जाणार अशी जागा झाल्याने या गल्लीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून जिल्हा परिषद शाळेसाठी जाण्याचा हा रस्ता मोठा दिसत आहे. ज्यामुळे या रस्त्यावरून सहज जाता येईल असा रस्ता झाल्याने विद्यार्थी, नागरिक, गावकरी यांची या रस्त्यावरून वाहतुकीसाठी सोय झाली आहे.

Post a Comment

0 Comments