संजय गांधी निराधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार- करीम गुळवे संगायो अध्यक्ष चाकुर

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीवरची निवड म्हणजे असहाय्य अपंग अंध कर्णबधिर, मतिमंद, विविध आजाराने ग्रस्त नागरिकांना थेट आर्थिक मदत करण्याची संधी आहे. गेल्या दोन तीन मिटींग मध्ये अनेक निराधारांचे पगार मंजुर करण्यात आली. येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक निराधारांना पगार देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असे संगायो चेअरमन करीम गुळवे म्हणाले ज्या लोकांनी आपले प्रस्ताव अॉनलाइन करुन तहसिल मध्ये दाखल केले आहेत.त्या सर्वाचे प्रस्ताव मंजुर करण्यात येतील. त्यामुळे आपले सामाजिक दायित्व निभावत सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन करीम गुळवे संगायो अध्यक्ष यांनी केले. सदर समितीवर नियुक्त सर्व सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला प्रतिमहा 1000 रुपये व अपत्य असल्यास 1200 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा नागरिक येते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापर्यंत असणान्या सर्वांना हा लाभ मिळू शकतो. चाकुर तालुक्यात निराधाराच्या पगारीसाठी कोणत्याही व्यक्तीना अडचण येणार नाही. तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी तलाठी व गिरधावर यांना सुचना केल्या आहेत. निराधारांचे काम लवकर करण्यात यावे. त्यांच्या कामा विलंब करु नये व योग्य पाञ व्यक्तीच्या निवडीसाठी तालुक्यात प्रयत्न करण्यात येणार आहे.
चाकुर तालुक्यात निराधरासाठी प्रभावीपणे प्रशासकीय यंञणा राबविण्यात येणार आहे. महसुल विभागातील कर्मचाऱ्यांनकडुन निराधारांची अडवणुक होणार नाही. तालुक्यातील पाञ नागरिकांनी आपले अर्ज सर्व कागदपञाची पुर्तता करुन दाखल करावे. अर्ज दाखल केलेली अॉनलाईनची पावती सांभाळून ठेवावी. दलाला मार्फत आपले अर्ज दाखल करु नये. कोणत्याही खाजगी व्यक्ती सोबत आर्थिक व्यवहार करु नये. तालुक्यात निराधाराची पगारासाठी प्रभावीपणे यंञणा राबविण्यात येणार आहे- करीम गुळवे,संगायो अध्यक्ष ता.चाकुर
0 Comments