निटूर येथे जागतीक आदिवासी दिन उत्साहात
निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) आज ग्राम पंचायत कार्यालय निटुर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच आदिवासी देवाता ईर वेताळ वाघदेव निसर्गपूजक आदिवासी यांचे पूजन करून जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी उपसरपंच संगमेश्वर करंजे, ग्राम पंचायत सदस्य शिवराज सोमवंशी, दत्ता कवडे, ग्राम पंचायत कर्मचारी बालाजी मगर, सोमनाथ भालके, अक्षय बुरकुले गावातील प्रतिष्ठित नागरिक दत्ता शिंदे, सुशांत पाटिल, राजकुमार सोनी व सर्व आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मुरली बसवणे, राजेंद्र सूर्यवंशी, अमोल टोंपे, मंगेश बसवणे, अनिल सूर्यवंशी, हर्षद बसवणे, रुपेश बसवणे, महेश बसवणे, सागर बसवणे आदी उपस्थित होते.
0 Comments