मदनसुरी कोकळगाव मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कासार सिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, सरपंच गुरलिंग वाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष लालमियाँ शेख, ग्रामपंचायत सदस्य मनोज लामतुरे, सुनील कांबळे, जगदीश सुर्यवंशी, मधुकर वागन्ना, भोलेनाथ आगलावे,राजेंद्र शिंदे,अमोल शिंदे,धीरज शिंदे, वसंत मंजुळे, रामदास सुर्यवंशी, स्वरूप सालेगावे शिवानंद पाटील, भिकाजी शिंदे, गणेश शिंदे , दिलीप शिंदे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्ञानेश्वर वाकडे, वसंत मंजुळे, जगदीश सुर्यवंशी, धीरज शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.

0 Comments