शिरोळ येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची बैठक
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबुत करण्यासाठी आणी तरुणांना पक्षाकडे आकर्षीत करण्यासाठी गावागावात जाऊन बैठका घेण्याचा झंझावात माजी जि.प.अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील मदनसुरीकर याच्यातर्फे राबवला जात आहे. त्या संदर्भी मौजे शिरोळ वां. येथे राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली. पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणे, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दुर करणे आणी शरद पवार साहेबांच्या विचारावर काम करणे अशा बाबींची चर्चा झाली. शिरोळमध्ये पक्षाची मोट बांधलेली बघुन गावच्या विकासात लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन पंडीतराव धुमाळ आणी दिलीप पाटलांनी दिले. या बैठकीस निलंगा शहराध्यक्ष ईस्माईल लदाफ, लीगल सेलचे अॅड.निहाल पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणी समारोप ग्रंथालय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका सरचिटणीस सलीम पठाण यांनी केले. बैठकीस सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, विद्यार्थी कांग्रेसचे ता.उपाध्यक्ष बंटी जाधव, युवकचे ता.उपाध्यक्ष किरण जाधव, सामाजिक न्याय चे ता.उपाध्यक्ष दीपक पुंडे, ग्रंथालय सेलचे सौदागर पुंडे आणी आजुबाजुच्या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.भविष्यात राष्ट्रवादी कांग्रेसला तालुक्यात अच्छे दिन येणार हेच यावरून दिसते.

0 Comments