Latest News

6/recent/ticker-posts

माचरटवाडी येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया

माचरटवाडी येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया 


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील ढोबळेवाडी वाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून मात्र माचरटवाडी येथील गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ दुर्गंधी व घाण पसरले आहे व ग्रामपंचायतीच्या वतीने या टाकीला तोट्या न बसवल्यामूळे  दिवसभर हजारो लिटर पाणी हे रस्त्यावर वाया जात आहे यामुळे रात्रीच्या वेळी पिण्याचे पाणी नागरिकांना भेटत नाही. जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत टाकीला पाणी काही तास झाल्यानंतर पाणी गळती होऊन टाकी रिकामी होती परिणाम ही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायत होऊन आठ महिने झाले तरीही मांचरटवाडी गावातील पाण्याच्या टाकीला तोट्या बसवलेले नाहीत व ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा करणारा कर्मचारी किंवा इतर कर्मचारी मात्र वाडी गावात कधी पाण्याच्या सुविधेसाठी फिरकले सुद्धा नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीने टाकी ची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा व टाकीला तोट्या बसवाव्यात अशी मागणी गावकरी आनंतराव कवटकर, प्रदीप भदरगे, धनराज भालके, भागवत चव्हाण, राजकुमार चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments