Latest News

6/recent/ticker-posts

लाडाची लेक लढणार सीमेवर ! एनडीए परीक्षेचा मार्ग झाला मोकळा

लाडाची लेक लढणार सीमेवर ! एनडीए परीक्षेचा मार्ग झाला मोकळा  


मुलींचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होणार साकार 

पनवेल:(प्रतिनिधी/मनोज बरडे) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीसाठी आता बारावी उत्तीर्ण असणा-या मुलींनाही परिक्षा देण्याची संधी सर्वेच्च न्यायालयाने दिली आहे. त्यानुसार एनडीए परीक्षेच्या माध्यमातून  मुलींना सैन्यात भरती होता येणार आहे. सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पनवेल परिसरातील मुलींकडून स्वागत करण्यात आले आहे. तर सिमेवर जाण्यासाठी लाडाची लेक आता सज्ज झाली आहे. शाळा तसेच महाविद्यालयाद्वारे चालविल्या जाणा-या एनसीसीच्या माध्यमातून मुलांमध्ये सैन्य दलाची आवड निर्माण केली जाते. सैन्यातील वर्दी  शाळेतील विद्यार्थांच्या अंगावर चढला की सैन्यातील शिस्त, देश प्रेम या गोष्टीची आवड निर्माण होते. यात मोजक्याच शाळा - महाविद्यालयात मुलींना परवानगी होती. मात्र आता प्रत्येक शाळेत मुलींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आणि नौदल अकादमी परीक्षेत पात्र मुलींना बसण्याची परवानगी देण्याबाबत उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. यावर एनडीए ची परीक्षा मुलींनाही देण्याचा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशसेवेसाठी एडीएमार्फत भरती होण्याचे स्वप्न पाहणा-या मुलींचा मार्ग मोकळा झाला आहे.

लष्करात प्रवेशासाठी …

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी अर्थात एनडीए, आयएमए आणि ओटीए अशा तीनही माध्यमाद्वारे लष्करात प्रवेश करता येणार आहे. या निर्णायाने मुलींना सेन्य दलात भरती होऊन गरुडझेप घेण्यासाठी उच्च न्यायालयाने दारे  खुली करुन दिल्याने मुलींमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजेच एनडीए प्रवेश परीक्षा मुलींनाही देता यावी यासाठी न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार  आता मुलींना सुध्दा एनडीएची परिक्षा देण्याचा  निर्णय सर्वेच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. सप्टेंबर मध्ये होणा-या परीक्षेस मुलींना बसता येणार आहे. कोरोनामुळे ही परिक्षा नोव्हेंबर मध्ये घेतली जाणार आहे. यासाठी पनवेल परीसरातील मुलींची तयारी देखील सुरु झाली आहे.

पनवेल महाविद्यालय स्तरावर १५० मुली 

पनवेल परिसरातील के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल , व्ही. के. हायस्कूल पनवेल , सी.के.टी .ज्यू कॉलेज नवीन पनवेल या तीन महाविद्यालयातील १५० मुली एनसीसी मध्ये आहेत. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबीरात या मुली सहभागी होत असतात. न्यायालयाच्या निर्णयाने  लष्करीसेवेत दाखल होण्याची संधी मुलींना मिळाली आहे.

लेकींनी मानले न्याालयाचे आभार 

न्यायालयाने परिक्षा देण्यासाठी मुलींना संधी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आहोत. लष्करी क्षेत्रातच मुलींना परवानगी नव्हती. ती पूर्ण होणार आहे. माझे स्वप्न साकार होणार आहे. त्याबद्दल मी आनंदी आहे. 

भूमीका खताळ, एनसीसी विद्यार्थी

न्यायालयाने मुलींना संधी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी मुलींना देखील लष्करात भरती व्हावे वाटते पण संधी न मिळाल्याने मागे राहावे लागत होते. पण आता ते स्वप्न साकार होणार आहे. यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. 

रुपाली ठाकूर, एनसीसी विद्यार्थी

एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी मुलींना संधी देण्यात आली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आता पर्यंत पोलीस दलात महिलांनी उत्कृष्ठ सेवा बजावली आहे. आता देश सेवेसाठी सैन्यात  कर्तत्व सिध्द करण्यासाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे. 

पुनम पवार, एनसीसी विद्यार्थी



Post a Comment

0 Comments