अपघाती मित्रास नळेगाव व्हॉलीबॉल स्पोर्ट क्लब चा मदतीचा हात
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे शिक्षण घेत असलेला विध्यार्थी अमोल गणपत वाघमारे याचा दि. 23-08-21 रोजी अपघात झाला असून त्याच्या मेंदूला मोठी जखम झाली आहे. तो सध्या सह्यादी हॉस्पिटल लातूर येथे उपचार घेत असून त्याची कौटुंबिक परिस्थिती बिकट असून त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे हे नळेगाव येथील नळेगाव व्हॉलीबॉल स्पोर्ट क्लब यांनी एक मदतीचा हात म्हणून सर्वांनी मिळून अपघाती मित्रास सहकार्य करण्यास पुढाकार घेतला आहे.तरी सर्वांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी अशी मागणी नळेगाव व्हॉलीबॉल स्पोर्ट क्लब च्या वतीने करण्यात येत आहे ,ज्यांना ऑनलाइन आर्थिक मदत करायची आहे त्यांनी जाधव संतोष जयचंद्र यांच्या 8600854235 या फोन पे व गुगल पे नंबर वर मदत करावी.

0 Comments