भेटा येथील शुभम मानेची अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी निवड
औसा: तालुक्यातील भेटा येथील संपत माने यांचे चिरंजीव शुभम माने यांची अमेरिकेस उच्च शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यामुळे औसा तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. शुभम माने याने 2018 मध्ये पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर जून 2018 मध्ये इन्फोसिस लिमिटेड मध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम चालू होते. शुभंमला आधीच सायबर सुरक्षेमध्ये रस होता म्हणून "ETHICAL Hacker" सारखे प्रमाणपत्र प्राप्त केले जे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त होते, त्याच बरोबरच गुरुग्राम सायबर सेलमध्ये प्रशिक्षण सुरू केले जेथे गुन्हेगारांचा मागोवा कसा घ्यावा हे शिकले आणि आता "DePaul University, CHICAGO" मधून सायबर सिक्युरिटी मध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण करणार आसल्याचे समजते. सदरील कोर्स हा दोन वर्षांचा असेल असा अंदाज असून दि 3 सप्टेंबरला रवानगी असल्याचे समजते, तसेच हा दोन वर्षांचा कोर्स ही यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शुभम माने यांनी यावेळी सांगितले.

0 Comments