रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अल्प दरात वाळू उपलब्ध करून देण्यात यावी- रिपाइं
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दि. 25/08/2021 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ता.देवणीच्या वतीने देवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यात तालुक्यातील सर्व गावामध्ये जवळपास एकुण 250 घरकुल मंजूर झाले असून ते सुरूवात करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत व त्यात वेळेत घरकुल पूर्ण करण्याचं सांगण्यात आले आहे परंतू या बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची कोडी झालेली आहे व एकीकडे असे संकट असताना दुसरीकडे वाळुचे दर हे निश्चित नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण केल जात आहे असे निवेदनात म्हटले आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सहज व अल्प दरात वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी देवणी तहसीलदार साहेबांना निवेनाद्वारे करण्यात आली यावेळी लातूर जिल्हा उपाध्यक्ष आय.टी.सेल गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर, देवणी ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड, देवणी शहराध्यक्ष विक्रम गायकवाड उपस्थित होते, दवणहिप्परगा शाखा अध्यक्ष गुणवंत कांबळे, उपाध्यक्ष उद्धव कांबळे, सचिव सतीश गायकवाड, विठ्ठल गायकवाड, वैजनाथ कांबळे, हरिश्चंद्र गायकवाड, पांडुरंग सुर्यवंशी, राजीव कांबळे, माधव गायकवाड आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments