औसा येथे साकारतोय भव्य तक्षशिला बुद्ध विहार
बी डी उबाळे
औसा: येथे सुरू असलेल्या तक्षशिला बुद्ध विहाराचे काम सध्या थंडावले असून हे काम पूर्ण होताच बौद्ध बांधवांना भविष्यात मोठा आधार मिळणार आहे. औसा येथे होऊ घातलेल्या तक्षशीला बुद्धविहारास मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी भेट देण्याचा योग आला यावेळी भेट दिली असता त्या ठिकाणी भव्य असे बुद्ध विहार उभारत असून याठिकाणी या पंच क्रोशीतील बुद्धविहाराचे वैशिष्ट्ये म्हणजे की येथे होत असलेल्या बुद्ध विहारास विहारात जाण्यासाठी लागणाऱ्या एकूण 26 पायऱ्या आहेत तर 26 खांबावर येथील इमारत उभारणी केली जात असून याठिकाणी नियोजित असलेली जागतिक शांतीचे प्रतीक असलेली बुद्ध मूर्ती हीं 26 फूट उंचीची असणार असल्याचे समजते. या बाबत अधिक माहिती ही बुद्धविहाराचे मुख्य प्रवर्तक/संयोजक धम्म सेवक राजेंद्र बनसोडे यांनी सांगितले. या ऐतिहासिक अशा भव्य विहारात भेट दिली यावेळी भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका अध्यक्ष मोतीराम कांबळे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे आणि लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी डी उबाळे उपस्थित होते. सध्या जगातील वातावरण पाहता जगाला युद्धाची नाही तर बुद्धांच्या अहिंसा आणि प्रेम, शांतीमय मार्गाची गरज आहे. यामुळे भविष्यात ही या शांती संदेशाचे जगात प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी सबंध बौद्ध बांधवांनी आणि बुद्ध विचारांनी प्रेरित सकल मानव जातीने याठिकाणी अवश्य भेट देऊन या धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य टिकवावे.

0 Comments