शिवसेना व युवासेनाच्या वतीने नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे आज निलंगा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करुन जाहीर निषेध करण्यात आला. तसेच निलंगा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना नारायण राणे वर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीभाऊ माने, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख डॉ.शोभाताई बैंजरगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना नेते लिंबन महाराज रेशमे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुका प्रमुख अविनाश रेशमे ,महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी ,माजी ता.प्रमुख ईश्वर पाटील ,शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे, मा.शहर प्रमुख हरीभाऊ सगरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत वाजंरवाडे, बलभीम कांबळे, रवी नागरसोगे, सादिक पठाण, शुभम डांगे,श्रीनिवास भोसले,सतीश रूपनर, किशोर स्वामी, अजय कांबळे, सहेजाद शेख, सतिश धाईगुडे,अजय वावरे व शिवसैनिक,युवासैनिक, महीला आघाडी आदी जण उपस्थित होते.
0 Comments