मुगाव येते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील मौजे मुगाव येते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधवराव जाधव यांच्या शुभ हस्ते व ध्वजारोहन सुरेंद्र धुमाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित गणेश महाळ, माजी तंटामुक्ती समितिचे अध्यक्ष खंडेराव वाडीकर, पोलिस पाटील यशवंत खटके, हणमंत नागमोडे, नागनाथ शिंदे, संतोष शिंदे, मधुकर शिंदे, उद्धव शिंदे, दत्ता सुरवसे, धनराज सुरवसे, करन शिंदे व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments